सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

0
31

नवी दिल्ली दि. २५ – सीबीएससीच्या 12 वीच्या परीक्षेत यंदा विद्यार्थींनींनी बाजी मारली आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशभरातील सर्व विभागांचा एकाच वेळी निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण 82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 87% मुली आणि 77% मुले आहेत. तिरुअनंतपुरम येथील निकाल सर्वांत चांगला आहे. या विभागाचा 95.4% निकाल लागला आहे.दिल्लीच्या न्यू ग्रीन फिल्ड स्कूलची एम. गायत्री ही प्रथम आली आहे 500 पैकी 496 मार्क तिला मिळाले आहेत. नोईडा येथील अमिती इंटरनॅशन मधील मैथली मिश्रा हिला 495 मार्क मिळाले असून, ती दुसरी आली आहे.

मात्र, आग्रा येथे एका विद्यार्थीनीने निकाल पाहाताच पुलावरुन यमुनेत उडी घेतली. तिथे पोहोत असलेल्या मुलांनी तिला वाचवले आहे. शाळेत टॉपर असलेल्या या विद्यार्थीनीला 60% गुण मिळाले यामुळे ती निराश झाली होती.