34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ        ‘डाक अदालत’चे आयोजन    

       ‘डाक अदालत’चे आयोजन    

0
93

गडचिरोली,दि.04 : विभागीय स्तरावर पोस्ट विभाग भारत सरकार यांच्यावतीने चंद्रपूर मुख्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील वरीष्ठ अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर या ठिकाणी दिनांक 26 मार्च 2020 रोजी डाक अदालतचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठी नागरिकांकडून पत्रव्यवहार, स्पीड पोस्ट, कार्यालयीन सेवा, बचत बँक, मनिऑर्डर याबाबत तक्रारी मागविण्यात आल्या आहेत. तक्रारी मध्ये विभाग / टपाल कार्यालय व त्यामधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे नाव किंवा पद नमूद करणे आवश्यक आहे. तक्रारी दिनांक 20 मार्च 2020  पर्यंत वरील पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन टपाल खात्याकडून करण्यात आले आहे.