नागपूरात “लॉ’ विद्यापीठाला जमिनच मिळेना

0
11

नागपूर – बहुप्रतीक्षित “महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी‘साठी शहरात 60 एकर जागा मिळत नसल्याने विद्यापीठ कागदावरच राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी बेसाजवळील कालडोंगरी परिसरात 60 एकर जागा निश्‍चित केली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळविणे आवश्‍यक आहे.विशेष म्हणजे या विद्यापीठाची घोषणा तत्कालीन राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील यांनी केली होती.परंतु महाराष्ट्र सरकारच्या विदभर् द्वेषा्च्या राजकारणामुळेच जमिन मिळू शकली नाही.विदर्भा व्यतिरिक्त जाहीर झालेल्या लाॅ विद्यापीठाला जमीनही मिळाली आणि कामही सुरु झाले.
नॅशनल लॉ स्कूलच्या धर्तीवर महाराष्ट्रात ती विधी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यानुसार मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरची निवड करण्यात आली होती. यापैकी मुंबई आणि औरंगाबाद येथील विद्यापीठ सुरूही झालेत. त्यासाठी प्रत्येकी 70 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, नागपूरच्या विधी विद्यापीठाला आवश्‍यक असलेली जागाच मिळाली नसल्याने विद्यापीठ अद्याप कागदावरच आहे. यानुसार शासनाकडून उच्च शिक्षण विभागाला जागा शोधण्यासाठी कळविण्यात आले होते. मात्र, नागपुरात दहा ते बारा एकरपर्यंतच जागा असल्याचे विभागाचे सहसंचालक यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सहसंचालकांनी नागपूरच्या नजीक असलेल्या जागांचा शोध सुरू केला. यानुसार बेसा मार्गावर असलेल्या कालडोंगरी परिसरात असलेल्या 60 एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. आता या जागेवर अंतिम निश्‍चिती झाल्यास विद्यापीठाच्या कामकाजास सुरुवात होण्याची शक्‍यता आहे.