रुग्णांना दिलेल्या औषधात उंदिर मारण्याच्या विषाचा समावेश!

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिलासपूर- जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात १५ महिलांचा मृत्यू झाला. या महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज बिलासपुरला पोचले असून त्यांनी भेट सुध्दा घेतली आहे.या दरम्यान, छत्तीसगड सरकारने सांगितले आहे, की नसबंदीनंतर महिलांना देण्यात आलेल्या औषधात उंदिर मारण्याचे विष होते. छत्तीसगडचे प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. आलोक शुक्ला यांनी सांगितले, की सिप्रोसिन नावाच्या या औषधात विषारी जिंक फॉस्फेट होते. उंदिर मारण्याच्या औषधात जिंक फॉस्फेट वापरले जाते.याप्रकरणात औषध तयार करणार्या कपनीविरुध्द गु्न्हा दाखल करुन कंपनीचे मालक व त्याचा मुलाला सुध्दा अटक करण्यात आली आहे.तर वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.काँग्रेसने मात्र आक्रमक पवित्रा घेत छतिसगडच्या आरोग्य मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संततीनियमन शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या औषधांमध्ये झिंक फॉस्फाइड होतं, असं प्राथमिक तपास-चौकशीतून समोर आलं आहे. उंदीर मारायच्या औषधात हे रसायन वापरलं जातं. त्यामुळेच आत्तापर्यंत १५ महिलांना शस्त्रक्रियेनंतर प्राण गमवावे लागल्याचा अहवाल आलोक शुक्ला यांनी दिला आहे. त्याआधारे संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.