गडचिरोली,दि.09- जिल्ह्यातील बेरोजगार महिलांना रोजगार तसेच विविध शासनाचे उपक्रम राबवून पोलिस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या रोजगार स्वयंरोजगाराच्या मागध्यातून आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व उद्योगविरहीत जिल्हा असून अजूनही येथील आदिवासी बांधव पारंपारीक शेती व्यवसाय करीत आहेत. शेती व्यवसायाव्यतिरिक्त कुठल्याही उद्योगाचे कौशल्य त्यांच्या हाताला नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ही बाब लक्षात घेुवन दुर्गम भागातील आदिवासी बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांचे जीवनमान उंचावावे या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलाच्या दादालोरा खिडकी व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून रोजी पोलिस मुख्यालयात भव्य महिला महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.
या महिला महारोजगार मेळाव्यात दुर्गम भागातील हॉस्पीटॅलिटी व नर्सिंग असिस्टेंट प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या १५७ युवतींना आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी शिलाई मिशन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ५७ महिला प्रशिक्षणार्थींना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शिलाई मिशनचे वाटप करण्यात आले. तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव येथे हॉस्पीटॅलिटी व नसिर्गक असिस्टंट प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या १00 महिला प्रशिक्षणीर्थींना गुलाबपुष्प व नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले. तसेच क्लीन १0१ हे फ्लोअर क्लिनर फिनाईल बनवून स्वत:चा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भ झालेल्या आत्मसमर्पीत मलिांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकार प्रणिल गिल्डा, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक राजेश थोकले, प्रोग्राम हेड अनिता घांघुडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
२५७३ युवक-युवतींना मिळाला रोजगार
गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन आजपर्यंत घेण्यात आलेल्या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नसिर्ंग असिस्टंट ११९३, हॉस्पीटॅलीटी ३४६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २५७३ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.२७९४ बेरोजगारांना स्वयंरोजगार प्रशिक्षण
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १0५ मत्स्यपालन ६0 कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १00, शेळीपालन ६७, शिवणकला १६२, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ५४0, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण ७८0, टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३0, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७0, असे एकूण २७९४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे