ब्युटी थेरपीस्ट प्रशिक्षणातून युवती व महिला आत्मनिर्भर होणार-sdo कु. पूजा गायकवाड

0
22

तिरोडा,दि.18ः- अदानी फाउंडेशन व अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर तिरोडाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सौंदर्य चिकित्सक प्रशिक्षणाचा शुभारंभ अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा येथे उपविभागीय अधिकारी कु.पूजा गायकवाड  यांच्या हस्ते करण्यात आले.प्रशिक्षणाच्या उद्घाटनिय कार्यक्रमात बोलताना उपविभागीय अधिकारी कु. पूजा गायकवाड म्हणाल्या की ब्युटी इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असून अदानी फाउंडेशनच्या ब्युटी थेरपिस्ट प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगले कौशल्य आत्मसात करून प्रशिक्षणामध्ये सहभागी युवती व महिलांनी आत्मनिर्भर व्हावे.तर श्रीमती रत्ना बिस्वास यांनी आपल्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना अदानी फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असून या माध्यमातून युवती व महिलांना नक्कीच रोजगाराची संधी उपलब्ध होऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहामध्ये हातभार लावतील असे विचार व्यक्त केले.प्रास्ताविक अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर हेड राजकुमार मोरे यांनी केले.याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अदानी फाउंडेशन प्रमुख बीमुल पटेल, अदानी पावरचे प्रवीण जायस्वाल तसेच डॉ.रिचा खरे उपस्थित होते.सूत्रसंचालन अदानी फाउंडेशनचे कार्यक्रमाधिकारी राहुल शेजव यांनी आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी कु कल्याणी परतेती यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशन अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.