जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानाला शांततेत सुरवात

0
26

गोंदिया दि. १८– जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरवात झाली असून सालेकसा तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल मुरकुटडोह येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान केंद्र यावेळी देण्यात आले आहे.त्याठिकाणी सुध्दा मतदानाला शांततेत सुरवात झाली आहे.

तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजय भाऊ रहांगडाले यांनी मूळ गाव खमारी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला

जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतीच्या ३०२२ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी व ३४८ सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी १००७ तर सदस्य पदासाठी ६२१० असे एकूण ७२१७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी गोंदिया १६२३, गोरेगाव ५११, अर्जुनी मोरगाव ६६७, देवरी ३६७, सडक अर्जुनी ६६४, सालेकसा ४९५, आमगाव ५७८ व तिरोडा १३०५ असे एकूण ६२१० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर सरपंच पदासाठी गोंदिया २३१, गोरेगाव ६८, अर्जुनी मोरगाव १३३, देवरी ७९, सडक अर्जुनी १२६, सालेकसा ८२, आमगाव ८० व तिरोडा २०८ असे एकूण १००७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १०८२ वार्डमध्ये घेण्यात येत आहे.

सेंद्रीटोला येथील मतदान केंद्रावर रागेंत असलेले मतदार