युवक-युवतींसाठी 9 जानेवारीला जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
6

गोंदिया, दि.5 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोरगाव येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत.

          इयत्ता दहावी व बारावी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

         अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.