29.5 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home रोजगार/व्यापार आदिवासी युवकांसाठी सुवर्णसंधी: देवरी येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण!

आदिवासी युवकांसाठी सुवर्णसंधी: देवरी येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण!

0
10

गोंदिया:आदिवासी जमातीमधील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना शासकीय सेवेत रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, देवरी (जि. गोंदिया) तर्फे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून २५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

📌 महत्त्वाच्या बाबी आणि पात्रता:

  • शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण (उच्च शिक्षण, टायपिंग किंवा संगणक कोर्स असणाऱ्यांना प्राधान्य).

  • वय व रहिवासी: वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असावा.

  • मानधन: निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा १,००0/- रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.

  • राहण्याची सोय: उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

📄 आवश्यक कागदपत्रे:

अर्जदारांनी अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला (LC), जातीचे प्रमाणपत्र, रोजगार कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड, बँक पासबुक आणि आधार कार्डच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) जोडणे अनिवार्य आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत (07199) 295168 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.

बेरार टाईम्स डिजिटल न्यूज | आपल्या हक्काचे माध्यम