23.9 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home रोजगार/व्यापार गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी एक वर्षाचा कृती आराखडा राबवा; स्थानिक उद्योगांना प्राधान्य द्या...

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी एक वर्षाचा कृती आराखडा राबवा; स्थानिक उद्योगांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

0
10
अँसिलरी उद्योग, ‘ब्रँड गडचिरोली’, निर्यात वाढ आणि ग्रामीण उद्योजकतेवर भर
मोठ्या उद्योगांना साहित्य पुरवणारे लघु किंवा मध्यम उद्योग.
गडचिरोली, दि. १७ जुलै :गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी पुढील एका वर्षात मोठ्या उद्योगांना साहित्य पुरवणारे (अँसिलरी) उद्योग, स्थानिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, ग्रामीण उद्योजकता आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या विकासाचा ठोस कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा. मोठ्या उद्योगांसोबत स्थानिक उद्योजकांची मजबूत पुरवठा साखळी निर्माण करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक रोजगार समिती तसेच जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीच्या संयुक्त बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (VIA), लॉईड्स मेटल्सचे प्रतिनिधी, स्थानिक उद्योजक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अँसिलरी डेव्हलपमेंट रोडमॅप, जिल्हा निर्यात कृती आराखडा, स्थानिक रोजगार, उद्योग भवन, ॲडव्हांटेज विदर्भ आणि नवउद्योजकांना सहाय्य या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तीन महिन्यांत अँसिलरी उद्योगांचे सर्वेक्षण; एका वर्षात प्रत्यक्ष परिणाम दिसले पाहिजेत
जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जिल्ह्यात उभारणी होत असलेल्या मोठ्या स्टील उद्योगांमुळे स्थानिक उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत संभाव्य अँसिलरी उद्योगांचे संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करून एका वर्षात प्रत्यक्ष उद्योग उभे राहतील, यासाठी नियोजनबद्ध काम करावे. विद्यमान जमीन, इमारत व वित्तपुरवठ्याची क्षमता असलेल्या उद्योगांना अँसिलरी उद्योगांमध्ये प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.