स्व. वसंत मातुरकर स्मृती काव्य मैफिल

0
11

गोंदिया,दि.२-येथील भवभूती रंगमंदिरात विदर्भ साहित्य संघ गोंदिया च्या वतीने स्व. वसंत मातुरकर यांच्या स्मृतीत काव्य मैफिलीचे आयोजन ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश शर्मा होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कवी धनराज ओक, विदर्भ साहित्य संघ गोंदियाच्या उपाध्यक्ष डॉ. राजश्री धामोरीकर, वर्षा मातुरकर, प्रसिद्ध साहित्यिक युवराज गंगाराम उपस्थित होते. यावेळी कवीवर्य स्व. वसंतराव मातुरकर ऋतुराज स्मृती काव्यगोष्टींचा उपस्थित सर्व कवींनी आनंद लुटला. या काव्य मैफिलीचे सूत्र संचालन साहित्यिक युवराज गंगाराम यांनी केले. यावेळी भिन्नभाषी कवींनी प्रतिमा, प्रतीके, रूपके, मिथके, दृष्टांत, यांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयाच्या ठाव घेतला. दरम्यान चैतन्य मातुरकर, कुमार कोकणे, विजय मेश्राम, रवी चंद्रिकापूरे, प्रभाकर लोंढे, चंद्रकुमार राहूले, माणिक गेडाम, यांनी मराठीत तर मनोज बोरकर, लोकेश जगणे, छगन पंचे, प्रकाश मिश्रा, संजय धामोरीकर, शशी तिवारी, ललित जायस्वाल, यांनी qहदी भाषेत कविता सादर केल्या. रमेश शर्मा धनराज ओक, आणि युवराज गंगाराम यांनीही आपल्या कवितांनी उपस्थित कवीतारसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. प्रारंभी चैतन्य मातुरकर व धनराज ओक यांनी कवीश्री स्व. वसंत मातुरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन माणिक गेडाम यांनी तर आभार कुमार कोकणे यांनी मानले.