अर्जुनीमोर बाजार समिती सभापतीपदावर काशीम जमा कुरेशी

0
23

अर्जुनी मोरगाव,दि.2 -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काशीम जमा कुरेशी तर उपसभापतीपदावर लायकराम भेंडारकर यांची निवड करण्यात आली. संचालक प्रमोद लांजेवार यांनी सभापती व उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता.परंतु एैनवेळेवर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने अविरोध निवडणुक पार पडली.निवडणुकीनंतर सभापती व उपसभापतींचे स्वागत करण्यात आले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,माजी सभापती उमाकांत ढेंगे,डाॅ.गजानन डोंगरवार,केवलराम पुस्तोळे,माजी सभापती प्रकाश गहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.