चांगले बोलण्यासाठी चांगला श्रोता बना – मोदी

0
21

नवी दिल्ली, दि. ४ – यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले. पालकांनी त्यांची स्वप्नं मुलांवर लादू नये व मुलांच्या आवडीनिवडी जाणून घ्यावात असे आवाहनही मोदींनी केली आहे.

शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी दिल्लीतील माणेकशाँ सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आई-वडील व शिक्षकांचे मोलाचे योगदान असते, असे मोदींनी सांगितले.गोव्यातील एका विद्यार्थ्यांच्या “तुमचा सर्वांत आवडता खेळ कोणता?‘ या प्रश्‍नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, “तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे राजकारणी कोणते खेळ खेळतात‘ असे उत्तर त्यांनी दिले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अन्य काही मंत्रीही उपस्थित होते.
भाषणानंतर मोदींनी विद्यार्थ्यांशी जवळपास दिड तास मनमोकळा संवाद साधला. राजकारणात येण्यासाठी काय करावे, देशसेवा कशी करता येईल, उत्तम वक्ता कसा होणार, कोणता खेळ खेळता अशी असंख्य प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारली. विशेष बाब म्हणजे मोदींनी या प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली.