बळीचे राज्य येण्यासाठी बळिराजाची मिरवणूक

0
9
पुणे – इडा-पिडा टळो. बळीचे राज्य येवो. सत्य की जय हो. बळिराजाचा विजय असो, अशा घोषणांच्या निनादात बलिप्रतिपदा दिनानिमित्त बळिराजाचा वेष परिधान केलेल्या बळिराजाची गौरव मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. फुले वाड्यापासून काढण्यात आलेल्या या गौरव मिरवणुकीची सांगता लाल महाल येथे झाली. याप्रसंगी मुख्य निमंत्रक प्रा. प्रतिभा परदेशी, अंकल सोनावणे, दीपक गिरमे, विठ्ठल सातव, सचिन बगाडे, शांताबाई गडपायले आदी उपस्थित होते. बळिराजा हा न्यायी, सद्‌गुणी, सद्‌वर्तनी, समतावादी, कृषिसंस्कृतीचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्वांना समान धान्यवाटप केले जात असे. अशा राजाची प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे, अशी माहिती प्रा. परदेशी यांनी या वेळी सांगितली.