मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन

0
19

गोंदिया दि. २ ६:: समता संग्राम परिषद, महिला जागृती संस्था व स्वयं संगत महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक तहसील कार्यालयालगतच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी मनुस्मृती दहन व स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात सतीश बन्सोड यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून भारतीय स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा लढा उभारला व आधुनिक युगातील स्त्री निर्माण करण्यास भारतीय प्रशासनास भाग पाडले, असे ते म्हणाले.
संचालन व आभार निरंजनी चिचखेडे यांनी केले. याप्रसंगी विनोद मेश्राम, राजू राहुलकर, एस.डी. महाजन, डी.पी. उके, राजाराम चौरे, प्रकाश वासनिक, कुंदा भास्कर, आशा जैन, सुधा बनाफर, किरण फुले, आशा फुलसुंगे, निरंजना चिचखेडे, के.टी. गजभिये, सुनिता भालाधरे, सरिता वैद्य, शोभा टेंभुर्णीकर, तरासन बन्सोड, अंकुश खोब्रागडे, रोकेश टेंभरे, देव चव्हाण, छाया बोरकर, एच.एस. साखरे, विनोद वासनिक, वाय.एस. तागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.