खासगी क्षेत्रातील आरक्षणातूनच साधेल प्रगती-सुखदेव थोरात यांचे प्रतिपादन

0
22

गोंदिया दि. २ ६:: स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही आज देशात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या जीवनात सर्व प्रकारच्या विषमता आव्हान म्हणून उभ्याच आहेत. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२0 पासून दलितांच्या प्रश्नांची उकल केली. चळवळी उभ्या केल्यात. संघटना आणि १९४३ साली शिक्षण व नोकर्‍यांमध्ये आरक्षण स्वातंत्र्यापूर्वी ‘इन्होलिशन ऑफ कास्ट्स’ या ग्रंथात दलितांचे सर्व प्रश्न मांडले, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात यांनी केले.
पुणाटोली येथील भवभूती रंगमंदिरात मंगळवारी असोसिएशन फॉर सोशल जस्टीस अँन्ड एकॉनॉमिक एम्पॉवरमेंट नागपूरद्वारे सामाजिक न्याय सभा आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वरिष्ठ साहित्यकार प्रभाकर गजभिये होते. अतिथी म्हणून डॉ.के.एम. कांबळे, डॉ. गौतम कांबळे, आयकर विभागाचे सहायक कमिशनर धनंजय वंजारी, डॉ. मनिष वानखेडे उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, सामाजिक न्यायाची उभारणी स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींवर होते.सन १९९0 नंतरच्या काळात देशभर खासगीकरणाचे जाळे पसरले. शिक्षणक्षेत्रसुद्धा खासगीकरणाच्या प्रक्रियेतून सुटले नाही. पालकांचा कल पाल्यांच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेएवजी खासगी शाळांकडे अधिक वाढत आहे. त्यासाठी वाट्टेल ती कॅपिटेशन फीस देण्यास पालक तयार असतात. परंतु वंचित घटकातील पालकांना आपल्या पाल्यांना खासगी शाळेत शिकविणे आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे सरकारी अनुदानातून चालविलेल्या शाळा वंचित घटकांच्या पाल्यांसाठी सोयीच्या ठरतात.परंतु आज जागतिकीकरणाच्या युगात या शाळांची स्थिती अत्यंत हलाखीची असून शिक्षणाचा स्तर खालावलेला दिसून येतो, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रा. नीता खांडेकर व संचालन प्रा. बबन मेश्राम यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. श्रीकांत भोवते यांनी करून दिले. आभार प्रा. प्रशांत टेंभुर्णीकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रा. अलका पाटील, प्रा. उमेश नागदेवे, अँड. प्रज्ञा डोंगरे, प्रा. किशोर वासनिक, प्रा.एच.पी. पारधी, प्रा.उमेश उदापुरे, प्रा. रोशन मडामे, प्रा. शशिकांत चवरे, डॉ.एस.आर. पाटील, प्रा. सुयोग इंगळे, प्रा. योगेश भोयर, प्रा. अमोल सातपुते, प्रा. विकास झाडे, डॉ. अरूण मेश्राम, प्रा. प्रविण लोणारे, प्रा.जे.डी. फुंडे, प्रा. धरमवीर चव्हाण, प्रा.नूतन चव्हाण, प्रा. सोमेंद्र बोरकर यांनी सहकार्य केले