पैकुजी ब्राम्हणकरांच्या स्मृतीदिनी प्रबोधन 

0
9
आमगाव : तालुक्यातील भोसा येथे स्मृतिशेष पैकुजी  ब्राम्हणकर यांचा प्रथम स्मृतीदिन प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी अमरावती येथील व्याख्याती प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संतांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी डॉ.येडेवार यांनी तुकडोजी महाराजांच्या अंत्यविधी संस्कार अध्यायाचे वाचन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमकर, मराठा सेवा संघ भंडारा जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी, मामा मते, सावन कटरे, अग्रवाल, शिवणकर, सुखदेव ठाकरे, सुखदास शेंडे, श्रावण तरोणे, दादाजु मटाले, माजी सरपंच कोरे, परसराम बहेकार, वैâलास भेलावे आदि उपस्थित होते. रमेश ब्राम्हणकर, क्रांती ब्राम्हणकर, सुनिल ब्राम्हणकर, निरज ब्राम्हणकर आदिंनी उपस्थितांचे आभार मानले.