कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

0
7

मुंबई- कल्याणच्या 15 वर्षीय प्रणव धनावडे या युवा क्रिकेटरने क्रिकेट विश्वात आज नाबाद 1009 धावा करीत अनोखा विश्वविक्रम केला. 323 चेंडूत नाबाद 1009 धावांची धडाकेबाज खेळी साकारताना प्रणवने 129 चौकार व 59 षटकार ठोकत जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान पटकावले. त्याच्या या खेळीमुळे भारतासह जगभरातील क्रिकेट विश्वातून त्याचे कौतूक होत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के.सी. गांधी शाळेतर्फे खेळणा-या प्रणवने आर्य गुरूकूल या प्रतिस्पर्धी संघाविरोधात हा विश्वविक्रम आहे. त्याच्या या खेळीमुळे सध्या ट्विटरवरही #Pranav Dhanawade हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. प्रणवने ३२३ चेंडूंमध्ये १२४ चौकार आणि ५९ षटकार फटकावत हा विक्रम रचला असून त्याच्या खेळीनंतर के.सी.गांधी शाळेच्या संघाने १४६५ धावांवर डाव घोषित केला.  प्रणवच्या या झंझावाती खेळानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरून त्याचे अभिनंदन करत त्याला भविष्यातील अशा खेळींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या धुवाधार फलंदाजीमुळे यापूर्वी १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स याने केलेल्या ६२८ धावांचा विक्रम मोडला गेला. रिझवी स्प्रिंगफील्डच्या पृथ्वी शॉ याने २०१४ साली मुंबईतील स्पर्धेत ५४६ धावांचा विक्रम केला होता. तो विक्रमही प्रणवने मागे टाकला आहे. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत १०वीत शिकत असलेला प्रणव काल ५ तास मैदानावर तळ ठोकून होता.

शिक्षण व क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार- विनोद तावडे

प्रणव यांच्या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली. प्रणवची कामगिरी उंचावण्यासाठी त्याला मदत म्हणून राज्य सरकारने त्याच्या उर्वरित शिक्षणाची व क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेईल अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. तावडेंनी प्रणवचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने त्याचा भव्य नागरी सत्कार करणार आहे अशी घोषणा महापौरांनी केली. शिवसेनेच्या वतीने प्रणव याला 1 लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे,