स्टडी सर्कलमध्ये रक्तदान शिबिर

0
12

गोंदिया :नवीन वर्षाचा पहिला सामाजिक कार्यक्रम म्हणून येथील स्टडी सर्कल या संस्थेत दि.४ ला रक्तदान शिबिराचे आणि परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २२ लोकांनी रक्तदान केले. अधिकारी हा सामाजिक भान असणारा असावा. तेव्हाच तो समाजासाठी काहीतरी करू शकतो. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून संस्थेने सामाजिक कार्यासाठी प्रेरित करावे. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत स्थान मिळाल्यास एक नैतिक जबाबदारी म्हणून ते शासनाच्या विविध योजना व उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यास सर्मथ ठरतील, असे मत रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक श्याम मांडवेकर, दिव्या भगत प्रामुख्याने उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. हुबेकर यांनी रक्तदानाचे महत्त्व, गैरसमज, समाजऋण कसे फेडावे यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. संचालन मनीषकुमार भगत यांनी केले. कार्यक्रमासाठी पूजा सोज्वल, वेदश्री बघेले, अर्चना रावते, रिना भोंडेकर, भाग्यश्री येडे यांनी सहकार्य केले