मोहाडीचा कारभार प्रभारी तहसीलदारावर

0
12

मोहाडी- येथील तहसिल कार्यालयाला पुर्णवेळ तहसिलदार न मिळाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदार अशा तीन अधिकार्‍यांची जागा असताना येथे केवळ एकच प्रभारी तहसीलदार आहेत. त्यांना वारंवार सभांकरीता जाणे होत असल्याने मोहाडी तहसील कार्यालय नावापुरतेच राहलेले आहे. मात्र यामुळे जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथीलच नायब तहसीलदार एच.एम. धोटे यांच्याकडे प्रभारी तहसीलदारांचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र नियमित तहसीलदार देण्यात आले नाही. दुसरे म्हणजे येथीलच नायब तहसीलदार १७ डिसेंबरपासून रजेवर गेलेले आहेत ते अजुनपर्यंत रूजु झालेले नाही. त्यामुळे तीन तहसीलदारांचा कार्य एकाच प्रभारी तहसीलदारांवर येवून ठेपला आहे.