श्रमदानातून तयार केली फुलवारी

0
15

गोंदिया दि.९:: नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथे घेण्यात आले. शिबिरातील रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात फुलवारी करीता बांधकाम करुन परिसराचा चेहरा-मोहरा बदलविला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या १00 स्वयंसेवकांनी सरपंच राखी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व रासेयो कार्यक्रम अधिकारी बबन मेश्राम, शिबीर प्रमुख रवी रहांगडाले, सहायक प्राध्यापक डॉ. संजय जगने यांच्या नेतृत्वात सात दिवस ग्राम सोनपुरी येथे शिबिरात घालविले. या शिबिरात या स्वयंसेवकांनी श्रमदानातून ग्रामसफाई, वनभ्रमण, वृक्षारोपण या सारखे उपक्रम राबवीत ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेच्या आवारात बांधकाम करुन परिसर स्वच्छ केला.
रासेयोच्या स्वयंसवेकांनी विटा उलचने, सिंमेट आणि वाळूचा गारा बनविण्यापासून तर विटा जोडण्यापर्यंत काम करुन सुरेख अशी फुलवारी निर्माण केली.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीलाल नागपुरे, रामलाल ठाकरे, दुलीचंद ठाकरे, लेखराम ठाकरे, जीयालाल ठाकरे, नटवरलाल जैतवार, पिंकेश्‍वर ठाकरे, पुरुषोत्तम नेवारे, गनराज धुवारे, गजानंद चौरागडे, सह गावतील युवक, नागरिक, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम समिती सदस्य यांनी विशेष सहकार्य केले. तसेच रासेयो स्वयंसेवक दीपक फुलबांधे, प्रियंका सोनवाने, चंद्रशेखर धुवारे, सारिका रहांगडाले, निकेश करेले, गायत्री धोटे, वैभव शहारे, सविता लिल्हारे, प्रकाश पटले, झामसिंग रणगिरे, प्रियंका किरणापुरे, कविता ठाकरे, माधुरी मेश्राम, रोहित गजभिये, ओमकुमार डहारे यांनी सहकार्य केले.