पिपरीया जनजागरण मेळाव्याला प्रतिसाद

0
15

सालेकसा दि.१९: पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत दुरस्थ सशस्त्र क्षेत्र पिपरीयाच्या वतीने पिपरीया परिसरातील लोकांना मुख्य धारेशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पिपरीया परिसरातील लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
प्राथमिक शाळा चिचटोलाच्या (पिपरीया) प्रांगणात पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना होत्या. अतिथी म्हणून पं.स. सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे, पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, पोलीस निरीक्षक बी.एन. औटी, सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव ननावरे, उपनिरीक्षक प्रताप वसगडे, सागर पडवळ, पं.स. सदस्य भारत लिल्हारे, सरपंच श्यामलाल लिल्हारे, उपसरपंच अशोक कुंभरे, ग्रा.पं. सदस्य शेरसिंह मच्छिरके, पुनाराम मेहर, मुख्याध्यापक आर.जी. दोनोडे आदी उपस्थित होते. 
मेळाव्यात जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय सालेकसाच्या वतीने मोफत औषधोपचार तसेच इतर विभागांकडून शासकीय योजनांची विस्तृत माहिती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्रकल्प कार्यालय देवरीच्या वतीने लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.  पुरुषांचे व महिलांचे कबड्डी सामने, महिलांचे विविध सांस्कृतिक नृत्य इत्यादी आकर्षनाचे केंद्र होते. शेवटी स्पर्धकांना बक्षीस देवून प्रोत्साहित करण्यात आले. ए.ओ.पी. च्या वतीने सर्व सहभागी लोकांना भोजानाची व्यवस्था करण्यात आली.
प्रास्ताविक शिवसाब येवारे यांनी केले,  संचालन प्रमोद सोनवाने यांनी केले. आभार उपनिरीक्षक सतिश घुगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.ओ.पी.चे सर्व पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांनी सहकार्य केले.