सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
9

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील गणेशनगर प्रभाग क्रमांक ९ येथील कैलाशचंद्र रुंगटा यांच्या घरापासून जायस्वाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतील सहा लाख रूयांतून या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. भूमीपूजन कार्यक्रमाला अशोक सहारे, दिनेशचंद्र अग्रवाल, नरेश अग्रवाल, मोहीत गौतम, गणेश ठोकळ, राजेश वर्मा सहित परिसरातील नागरिक उपस्थित होते.