सत्याचा बोध होताच भ्रम रोग पळून जातात

0
16

गोंदिया : संगत हीच वस्तूला हीन करते व संगतीतूनच वस्तूला उत्कृष्टता लाभते. दुसर्‍यांच्या नजरेतूनच संप्रदाय जन्म घेते. सत्याचा जोपर्यंत बोध नाही, तोपर्यंत भ्रमाचा रोग आहे. जेव्हा सत्याचा बोध होतो, तेव्हा भ्रमाचे रोग पळून जातात, असे प्रतिपादन आचार्य १0८ विशुद्ध सागर यांनी केले. येथील दिगंबर जैम समाजाच्यावतीने गुर्जर क्षत्रीय समाजवाडीत आयोजीत आचार्य पदारोहण दिवस कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
पुढे बोलताना आचार्यांनी, ज्याचा जन्म आहे, त्याचे मरण निश्‍चीत आहे. त्यामुळे मग कशाला रहायचे. मनुष्य बनल्याशिवाय कुणीही देवता बनू शकत नाही. जो एकात एक व एकात अनेक दाखवून देतो त्याचेच नाव भारताचे सत्य दर्शन आहे. जो मनुष्यालाच देवता मानतो तो जीव आहे. आणि जो देवतालाच देवता मानतो तो सर्वात मोठा अज्ञानी आहे. कारण आत्माच परमात्मा बनते व मनुष्यच पुरूषार्थ करून देवता बनतो असे उद्गार व्यक्त केले.
आचार्य विशुद्ध सागर यांच्या पदारोहण दिनानिमित्त येथील दिगंबर जैन मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. मुख्य मार्गाने होत या शोभायात्रेचा समाजवाडीत समारोप करण्यात आला. येथे सर्वप्रथम अनिल जैन (खैरागड) यांच्या हस्ते आचार्यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. पद प्रच्छालन पंकज जैन यांनी केले. शास्त्र भेट मांगीलाल पहाडे यांनी तर आरती बाबूलाल जैन यांनी केली.
पश्‍चात दुर्ग येथील सकल जैन समाज महावीर जयंती समारंभ अध्यक्ष विशाल पारेख, जैन समाजाचे अध्यक्ष महावीर गंगवान यांच्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान व अन्य ठिकाणांहून भाविकांनी श्रीफळ भेट देऊन आचार्यांची आर्शिवाद प्राप्त केला. तसेच महिलांनी भक्ती नृत्य सादर केले. कमलकुमार कमलांकुर व राजेश राज यांनी गं्रथ प्रकाशन केले. प्रास्तावीक ट्रस्टी आमदार राजेंद्र जैन यांनी मांडले. याप्रसंगी संजय जैन, निर्मल जैन, प्रकाशचंद्र अजमेरा, अंजू बजाज, देवेंद्र अजमेरा, अशोक ठोल्या, रत्नप्रभा कासलीवाल, कांती जैन, मेघना पांड्या, पूजा पांड्या, गरिमा गोधा, हिना अजमेरा, नेहा जैन, हिमानी जैन, निशी जैन, शैली जैन, श्रद्धा गोधा यांच्यासह मोठय़ा संख्येत समाजबांधव उपस्थित होते.