महालगाववासीयांचे आमरण उपोषण

0
18

अर्जुनी मोरगाव : महालगाव येथील समाज मंदिराची तोडफोड करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या विनापरवानगीने मांडल्या. त्या सन्मानपूर्वक हलविण्यात याव्यात यासाठी महालगाव येथील १0 गावकरी बुधवारला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले आहेत. शुक्रवार (दि.१) उपोषणाचा तिसरा दिवस आहे. कथीत समाज मंदिराच्या आवारात कुठलेही अवैध बांधकाम करण्यात येऊ नये. समाज मंदिर तसेच आवारात कोणत्याही मूर्त्या मांडू नये. समाज मंदिराचे कोणत्या योजनेतून बांधकाम झाले ते स्पष्ट करावे. अवैधरित्या बांधकाम करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी. महामानवांच्या मूर्त्या रात्री १२ वाजता मांडून त्यांचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच त्या सन्मानपूर्वक सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात याव्या इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. कुंडलीक मारगाये, योगेश मारगाये, रावजी मारगाये, बाबुराव भोयर, उद्धव भोयर, यशवंत चुलपार, मुकेश नाईक, रामदास नाईक, चिंतामण राणे व दिनेश मारगाये अशी उपोषणकर्त्यांची नावे आहेत.