मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली!

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- मुंबई महापालिकेने मुंबई व परिसरात हुक्का पार्लरवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने आज उठवली. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अधिकृतपणे हुक्का पार्लर सुरु होणार आहेत. ज्या ठिकाणी व हॉटेलात स्मोकिंग झोन आहेत त्याठिकाणी हुक्का पार्लर चालवायला काय अडचण आहे असे सांगत महापालिकेचा सरसकट हुक्का पार्लरवरील बंदी उठवली आहे. डान्सबारप्रमाणेच तरुणांना व्यसनाधीन बनवण्याचे प्रकार ‘हुक्का पार्लर’च्या माध्यमातून होत असल्याचे आढळून आल्यानंतर हुक्का पार्लर संस्कृतीतून बाहेर काढण्यासाठी व तरूण मुला-मुलींना व्यसनापासून रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने तीन वर्षापूर्वी यावर बंदी घातली होती. आता मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यावरील बंदी उठवली आहे.

हुक्का पार्लरवर बंदी असतानाही मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निष्पन्न होत होते. बंदी असतानाही ते चालूच राहायचे. सरकार व प्रशासनाच्या पातळीवर दुर्लक्ष होत असल्याने तो राजरोस सुरू होते. तरीही हुक्का पार्लर बंद करण्याच्या विरोधात मुंबईतील काही व्यावसायिक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने हुक्का पार्लर व्यावसायिकांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा हुक्का पार्लर संस्कृती येणार असून, तरूणाई व्यासनाधिनेतकडे ओढली जाण्याची भीती आहे.