कोरफडचे ‘हे’ 4 उपाय केवळ तुमचे आरोग्यच नव्हे नशीबही बदलणार; होणार बंपर फायदा

0
4

Aloe Vera Benefits : तुम्ही आतापर्यंत त्वचेसाठी, केसांसाठी तसेच तुमच्या आरोग्यासाठी कोरफडीचे अनेक फायदे ऐकले असतील मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? ग्लोइंग स्किन देणारा कोरफड तुमचे नशीब देखील बदलू शकते. होय, वास्तुशास्रानुसार कोरफड तुमचे नशीब देखील बदलू शकते.

वास्तुशास्रानुसार या वनस्पतीच्या युक्त्या आणि उपायांच्या मदतीने जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोरफड कोणत्या पदतीने तुमचे नशीब बदलू शकते.

सुख-समृद्धीसाठी कोरफडीचे रोप या दिशेला ठेवा

तुमच्या घरामध्ये सतत भांडण आणि कलह होत असेल तर कोरफड वनस्पती ही समस्या सोडवू शकते. यासाठी घराच्या पश्चिम दिशेला कोरफड लावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. जीवनातील रखडलेल्या व्यवसायात थोडेसे प्रयत्न यशस्वी होतील.

आर्थिक समस्याही दूर होतील

जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर आणि कर्जाचा डोंगर वाढत असेल तर घरी कोरफडीचे रोप लावा. हे रोप बागेत किंवा बाल्कनीमध्ये लावा. असे केल्याने नकारात्मकता दूर होते. पैशाचे मार्ग मोकळे होतात. मन शांत राहू लागते. कर्ज आणि आर्थिक संकटातून तुम्हाला लवकरच आराम मिळू शकेल.

जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात समस्या येत असतील. दररोज भांडणे वाढत असतील किंवा नात्यात तणाव निर्माण होत असेल तर घराच्या पूर्व दिशेला कोरफडीचे रोप ठेवा. असे केल्याने माणसाच्या आयुष्यात प्रेम वाढते. भागीदारांमधील गैरसमज दूर होतील. पदोन्नतीची शक्यता आहे.

या दिशेला ठेवल्याने समस्या निर्माण होऊ शकतात

कोरफडीचे रोप घरी लावणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे तितक्याच मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी कोरफडीची रोपे दिशा पाहूनच लावावीत हे लक्षात ठेवा. चुकूनही उत्तर दिशेला लावू नये. असे केल्याने अशुभ फळ मिळते. संकटांचा सामना करावा लागतो.(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)