लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा प्लॅन!

0
5

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (Bjp) जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचं मिशन 45 प्लस सुरू झालं आहे. लोकसभेत भाजपच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजपने (Bjp) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठा प्लान आखला आहे. या प्लाननुसार भाजप चक्क लोकप्रिय आमदारांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची तसेच लक्षवेधी ठरणार आहे.लोकसभेसाठी भाजपने Bjp) विद्यमान खासदारांना तिकीट देतानाच राज्यातील 7 ते 8 आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील लोकप्रिय आमदारांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार, संकटोमोचक गिरीश महाजन, आमदार आकाश फुंडकर, रवींद्र चव्हाण, संजय केळकर आणि राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं कळतंय. हे सातही आमदार लोकसभेच्या मैदानात उतरल्यास अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असल्याचंही स्पष्ट होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 बद्दल माहिती दिली होती. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.