महिला पोलीस गुणेश्वरीच्या सतर्कतने अडकला चोर

0
8

गोंदिया,दि.21 : मंगळवार बाजाराचा दिवस त्यातच सायकांळच्या सुमारास शहर पोलीस ठाणेशेजारीच एका चोरट्याने एका दुकानातील पैसे लंपास करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला.हे लक्षात येताच त्याच भागात असलेल्या महिला पोलिस शिपाई गुणेश्वरीने सिनेमास्टाईलने चोरट्याच्या मागे धावत त्या चोरट्याला पळून जाण्यापासून रोखले.त्या महिला पोलिस शिपाई कर्मचारीचे नाव गुणेश्वरी भांडारकर असून तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
शहराच्या गोरेलाल चौकातील कमल बुक डेपोजवळ घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेत एका व्यापार्‍याची ११ हजार रुपयांची बॅग घेऊन पळणार्‍या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील व्यापारी विपीन दिनेश जयपुरीया (२७) हे दुकान बंद करून गल्लय़ातील ११ हजार रुपये एका काळ्या बॅगमध्ये टाकून घरी जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील मोहगावखारा येथील रहिवासी असलेल्या राहूल हसनलाल गराडे (२१) याने ती बॅग हिसकावून पळ काढला. यावेळी जयपुरीया यांनी चोर-चोर अशी आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. परंतु तो जोरात धावत सुटला.
गोंदिया शहर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७९, ५११ अन्वये गुन्हा दाखल केला.