देवरीचा गुंजन अग्रवाल सीए परीक्षेत उत्तीर्ण

0
15

देवरी- येथील प्रतिष्ठित व्यापारी मधुसूदन अग्रवाल यांचा मुलगा गुंजन याने यावर्षी घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत यश संपादन केले.

देवरी येथील अग्रवाल फॅब्रीकेशनचे मालक मधुसूदन अग्रवाल यांचा मुलगा गुंजन यांंने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या सीएच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि आपल्या सर्व मार्गदर्शक यांना दिले आहे.