संस्कृतला सावत्र जननी होण्याचा सुध्दा अधिकार नाही

0
30
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्धा:- लोकांच्या स्पंदनातून जन्मलेली भाषा लोकभाषा असून, लोकभाषा ही कवयित्रींची भाषा आहे. महाराष्ट्रातील ४२ लोकभाषा जतन करण्याची गरज आज आपल्ङ्मा सर्वांवर आली आहे. त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करावा लागणार आहे. माणसाच्या भाषेची सुरुवात संकेतांतून होते. म्हणून कुठलीच भाषा मरू शकत नाही.इतर भाषेची भाटगिरी सोडल्याशिवाय आपल्ङ्मा बोलीभाषेचा व लोकभाषेचा विकास होऊ शकत नाही,हे जोपयर्त आपण स्वीकारणार नाही.तोपर्यत आपल्या बोलीभाषेचा विकास शक्य नसल्याचे विचार डॉ.साहेब खंदारे यानी व्यक्त केले.
पुढे म्हणाले की कुठलीही भाषा ही मरत नसते,मरते ती संस्कृती.संस्कृती सोडली की मनुष्ङ्म हा पशू बनतो.आज आपल्या िसधू व नागवंशिय ‘मुलसंस्कृतीचा र्हास ज्यानी केला त्यांनी आपल्या डोक्यावर ज्या भाषेचे अस्तित्व नाही,ती आणून ठेवली आहे. त्यामुळे आपल्या लोकभाषेचा विकास व संवर्धनासाठी आपल्ङ्मा लोकभाषा नष्ट करू पाहणार्या विरोधकांचे शस्त्र माहित करून त्याचा वेध घ्यायला हवे,असेही ते म्हणाले.
ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजकाङ्र्म महाविद्याल सभागृहात आयोजित लोकभाषा समेलनाच्या संस्कृत सर्व भाषांची जननी आहे या विषयावर आयोजित परिसवांदाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
एन.जी.कांबळे म्हणाले की तमील ही भाषा कश्मीरपासून ते कन्ङ्माकुमारीयर्त विस्तारीत झालेली होती.ती भाषा बोलणारे लोक त्यामुळे त्याकाळची ती लोकभाषा होती असे इतिहासकार भांडारकर स्वतःच म्हणत असताना संस्कृत ही इतर भाषांची जननी कशी होऊ शकते.
प्रा.गोटे म्हणाले की,संस्कृत ही कुठल्ङ्माही भाषेची जननी नसून ती जननी असल्ङ्माचे िबबण्ङ्मात येत आहे. ती व्यभिचारी भाषा आहे.दर दहा किमी अंतरावर भाषा बदलत असताना ती जननी कशी? प्रत्येक देश भाषेचा जनक असू शकतो.प्रत्ङ्मेक देशाची भाषा असते आणि संस्कृत ही कुठल्ङ्माही देशाची भाषा नाही. भाषेची निर्मिती बोलीभाषेतून होते.
प्रा.खंडारे म्हणाले की आपल्या लोकांनी संस्कृत भाषेचा विरोध करण्याएैवजी तिचा गोडवाच गायनाचे काम केल्याने आज आपल्या मानगुटीवर बसविण्याचे काम केले जात आहे. संस्कृत ही भाषाच नसल्याने ती कुठल्याही भाषेची जननी होऊ शकत नाही.तरीही ती का टिकून आहे, याचा शोध लोकभाषेच्या हितचिंतकाना घ्यावे लागणार आहे.
पत्रकार प्रभाकर कोडंबत्तुमवार म्हणाले की,भाषा सवांदाचे माध्यम आहे.मराष्ट्रातील प्रमाण मराठी ही एका जिल्ह्यातील लोकांची भाषा ही ३४ जिल्ह्यांची प्रमाणभाषा तिलाच आमचा खरा आक्षेप आहे.प्रमाणीकरणाचे आग्रह धरले तर िहदीचे १२ राज्य तयार झाले नसते,एकच राज्य असते.
प्राचार्य डा.आशा देशमुख म्हणाल्या की,संस्कृत ही भाषाच नसून तिला सावत्र जननी सुध्दा होण्याचा अधिकार नाही.इतिहासात कुठेच संस्कृत ही भाषा असल्याचा पुरावा नाही.उत्खनन्नात उल्लेख नाही फक्त तिला राजाश्रय ‘मिळाल्याने आज संस्कृत आमच्या बहुजनावर लादण्याचे षडयंत्र मानव संशाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहे. ज्या भाषेला 10 विद्याथीर् मिळत नाही त्यासाठी हट्ट कशाला असे म्हणत बोलीभाषेत शिक्षण देण्याचे धाडस सरकारने केल्यास कुठली भाषा कुणाची जननी कळेल अशा त्या म्हणाल्या.