संजय दत्तचा पॅरोल अर्ज रद्द करा

0
7

पुणे : अभिनेता संजय दत्तचा पॅरोल अर्ज रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली. सर्व आरोपींना समान न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे संजय दत्तची सतत होणारी पॅरोलची मागणी मान्य करू नये असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी केला.

अनेक गरजू कैद्यांना अर्ज करूनही जेल प्रशासन पॅरोल मान्य करत नाही. पण संजय दत्त केवळ अभिनेता आहे म्हणून पॅरोल मंजूर होतो का, असा सवालही यावेळी विचारण्यात आला. पॅरोलच्या कायद्यात बदल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

संजय दत्तचा पॅरोल मान्य झाला तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा संघर्ष समितीनं दिला आहे. त्यामुळं पॅरोलची सुट्टी मागणाऱ्या संजू बाबाला आता सामाजिक संघटनांचा विरोध होऊ लागल्याचं चित्र आहे