राजकारणी सर्वत्र चालतात मग साहित्य संमेलनात का नाही? – सदानंद मोरे

0
14

पुणे: राजकारणी सर्वत्र चालतात मग साहित्य संमेलनात का नाही असा सवाल 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत मोरे बोलत होते.
राजकारण्यांचा संमेलनात उचित सन्मान करु मात्र त्यांचा हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचंही सदानंद मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. याशिवाय जगण्याचे आणि अस्मितेचे प्रश्न यांची गल्लत करु नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मराठी पालकांनी मुलांना इंग्रजी शाळेत घातलं तर पालकांना मराठीचा अभिमान नाही असा त्याचा अर्थ होत नाही, असं सांगत त्यांनी भालचंद्र नेमाडेंच्या काही दिवसांपूर्वीच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं. शेतकरी हा जन्मजातच कर्मयोगी असतो त्यानं फळाची अपेक्षा धरु नये असा सल्ला संमेलनाध्यक्षांनी यावेळी दिला.यंदाचं साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे होणार आहे.