गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून 2014 रोजी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडेंच्या निधनाने देशाला धक्का बसला होता. कारण मुंडेंनी केंद्रीयमंत्रीपदाची शपथ घेऊन केवळ 7-8 दिवसच झाले होते. भल्या पहाटे उठून ते दिल्लीहून मुंबईकडे रवाना होण्यास आपल्या घरातून विमानतळाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात गोपीनाथ मुंडेंचे जागीच निधन झाले. मुंडेंच्या निधनाचा धक्का महाराष्ट्राला सहन झाला नाही. संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला होता. आयुष्यभर प्रस्थापितांविरूद्ध दोन हात करीत उपेक्षित-शोषित वर्गाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी कायमच घेतली. त्यामुळे या वर्गात त्यांनी एक विश्वास निर्माण केला.त्या लोकनेत्याची परळी येथे जयंती साजरी करम्यात आली त्या सही उफाळलेला जनसमुदाय त्यांच्यावरील विश्वास आजही कायम असल्याचे सांगत होता.
शरद पवारांशी त्यांनी राजकीय वैर पत्करले आणि त्यांच्या राजकारणाविरूद्ध कायमच एल्गार पुकारला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 50 वर्षापासून दबदबा असलेल्या पवारांशी लढाई लढल्याने मुंडे नाही रे वर्गाचे प्रतिनिधी केव्हा झाले कोणाच कळले नाही. त्याआधीही त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपला रूजविण्यासाठी मेहनत घेतली होती. प्रमोद महाजन यांची खंबीर साथ राहिल्याने मुंडेंनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष न घातला राज्याचा कोपरा ना कोपरा पिंजून काढीत भाजप वाढवला. लोकसंपर्क व अन्यायाविरूद्ध संघर्षाची तयारी असल्याने मुंडे लोकांचे हिरो बनले होते. त्यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी गोपीनाथ यांना लोकनायक, लोकनेता असे म्हटले होते. आज ते हयात नसले तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे.
भाजपमध्ये शरद पवारांशी खुलेआम विरोध पत्करुन पक्ष वाढविणारे एकीकडे मुंडे साहेब होते.तर दुसरीकडे याच भाजपमधये शरद पवारांसी सलगी ठेवणारे नितिन गडकरी होते.गडकरी पवारांची मैत्री सु्ध्दा मुंडेसाहेबांच्या हितासाठी योग्य नव्हती.मुंडे साहेबांचा ज्या दिवशी दिल्लीत अपघात झाला(की अपघात करवला गेला) त्याच्या आदल्या रात्री काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही.मुंडे साहेबांना मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत तुमच्या जीवाला धोका असल्याची कल्पना त्यांच्या पोलीस विभागातील हितचिंतकानी दिली होती,तरीही साहेब त्याकडे दुलर्क्ष करुन बसले आणि त्यातच खरा त्यांचा घात झाला असावा अशा संशय आजही त्यांच्या चाहत्यामध्ये आहे.त्या दिवशी गाडीमध्ये असलेल्यांच्याही इतिहास बहुजनांनी शोधून ती कुणाची पेरलेली तर माणसे नव्हती ना याचा शोध घ्यायला हवे.बहुजनांचा लोकनेता आज असता तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असता बहुजन ओबीसीना भाजपमध्ये न्याय मिळाला असता संघाच्या ब्राम्हणी विचारधारा मानगुटीवर बसली नसती हे ही तेवढीच खरी असल्याचीही चर्चा आहे.
गोपीनाथ मुंडे हे लोकनेता होते. त्यांच्या सभेला उपस्थित असणारे लोक त्याची साक्ष द्यायचे. गर्दी खेचणारे वक्ते व लोकांचा पाठिंबा असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. राज्य भाजपमधील सर्वात मोठे ते नेते होते नव्हे देशातील भाजपमधील टॉपचे ते नेते होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंडेंच्या निधनाच्या सहानुभूतीचा फायदा भाजपला झाला. मात्र, पुढील काळात तो मिळेल अशी खात्री देता येणार नाही. मुंडेंची सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली ऊठबस व संपर्क यामुळे शरद पवारांनंतर राज्यातील सत्तेचे केंद्र मुंडेंकडे जाण्याची स्थिती असतानाच ते या येथून निघून गेले. आता मुंडे नाहीत, पवारांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्याला आता ख-या अर्थाने लोकनेता उरलेला नाही. अशा स्थितीत मुंडेंशिवाय भाजप आगामी काळात राज्यात कसा झेप घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गोपीनाथ मुंडेंनी भाजपला फक्त भटजी व शेटजीचा पक्ष न ठेवता राज्यातील तळागाळापर्यंत पोहचवला. त्यामुळे आज राज्यात भाजपला मोठा जनाधार मिळालेला आहे. आज मुंडे नसताना भाजपने मोठे यश मिळवले असले तरी त्या यशाच्या इमारतीची पायाभरणी त्यांनी पहिलीच केली होती. बहुजन, दलितांना भाजपसोबत जोडण्यात मुंडेंचा मोठा वाटा राहिला. हा वर्ग भाजपला आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल,
– गोपीनाथ मुंडे आज हयात नसले तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही राज्यात आहे. त्यांना भाजपला संधी द्यावी लागेल तरच तो वर्ग भाजपसोबत कामय राहील.
– गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यप्रणालीसारखेच काही प्रमाणात फडणवीस सध्या काम करीत आहेत. मात्र, आगामी काळात पक्षाच्या बदलत्या शैलीबरोबर ते टिकवून ठेवणे जमते की नाही यावर भाजपचा जनाधार ठरू शकेल.
– गोपीनाथ मुंडेंचे प्रत्येक स्वप्न व दिलेले आश्वासन पाळण्याचे वजन पंकजा मुंडेंनी दिले आहे. पंकजा मुंडेंना वडिलांच्या कृपेमुळे एक प्रस्थापित नेता होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांनाही मुंडेंची पायवाट तुडवावी लागेल.
– काळाबरोबर लोक बदलत असतात, समाज बदलत असतो त्यामुळे राजकीय पक्षबी बदलत जाणार हे जितके वास्तववादी तेवढेच सत्य असते. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा बहुजनातील गोपीनाथ मुंडे शोधावा लागणार आहे.