कर्तव्यदक्ष आशा सेविकाची भुमिका
गोंदिया, दि.21 :जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील येथील सुरबन येथील अश्विनी विकेश उईके हि स्वत: 9 महिन्याची गरोदर माता आहे. अवघ्या 10 दिवसावर तिची प्रसुती होणार आहे. अशा अवस्थेतही आपल्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना आरोग्य सेवा मिळुन त्यांचे सुरक्षित बाळतंपण होण्याची तिची धडपड आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका या ग्रामीण आणि नागरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत.त्या गावपातळीवर स्थानिक रहिवासी असून, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. काम तत्वावर त्यांचे मानधन त्यांना मिळत असते.आशा वर्कर ही गावातील आरोग्य सेवेची ‘पहिला संपर्क बिंदू‘ आहे, जी लोकांना आरोग्य हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांच्यात समन्वय साधून काम करतात.
दि. 13 फेब्रुवारी रोजी ग्राम सुरबन येथे माता व बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता व बालकांचे नियमित लसीकरण सत्र संपन्न झाले.झाले.आपले घरचे कुटुबांचे सगळे कामे आटोपुन सकाळी 9 वाजताच अंगणवाडीतील लसीकरण सत्रात आशा सेविका अश्विनी उईके ही आपल्या कर्तव्यदक्ष कामावर उपस्थित होती. त्यावेळेस पिएचसी गोठणगावची आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, आरोग्य सेविका शामकला नहामुर्ते व अंगणवाडी सेविका सुद्धा हजर होते.
आरोग्य क्षेत्रातील आशा वर्करची भूमिका हि महत्वाची असते.माता आणि बाल आरोग्य कार्यक्रमात गर्भधारणा नोंदणी, सुरक्षित प्रसूती सोबत लसीकरण,पोषण, स्तनपानाचे,नवजात शिशु काळजी,स्वच्छता व सवयी,कुटुंब नियोजन याचे महत्व, आरोग्य शिक्षण आणि प्रबोधन करण्यात महत्वाचे असते.गरोदर मातांची सुरुवातीलाच नोंदणी करणे आणि त्यांना प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आरोग्य केंद्रात घेऊन जाणे हे तिचे आद्य कर्तव्य. सामाजिक कार्यकर्ता म्हणुन औषध किट, रेफरल सेवा व टीबी आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमात समुपदेशन करण्यास्तव कायम उपस्थित राहतात. साथीचे रोग (उदा. मलेरिया, डेंग्यू, टीबी) पसरल्यास जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगणे. प्राथमिक आरोग्य सुविधा जसे औषध किट आशा वर्करकडे प्राथमिक औषधांचे किट असते, ज्याद्वारे त्या ताप, हगवण, लहान जखमा यांवर प्राथमिक उपचार करतात.रेफरल सेवा गरजू रुग्णांना, विशेषतः गरोदर माता व बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाणे.टीबी आणि कुष्ठरोग नियंत्रण क्षयरोग रुग्णांना डॉटस उपचार आणि कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचारात मदत करणे. सामाजिक कार्यकर्ता महणुन घरोघरी जाऊन विविध आरोग्य सर्वेक्षण करण्यात त्यांचा हातखंड असतो.




