पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

0
10

गोंदिया,दि.२१ : मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री काळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन केले.
यावेळी शहीद झालेल्या ४७३ पोलीस अधिकारी व शिपायांच्या नावाचे वाचन गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी केले. बंदूकीच्या ९० फैरी हवेत झाडून शहीद पोलीस अधिकारी व शिपायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाचा सहभाग होता.
कार्यक्रमाला जि.प.माजी अध्यक्ष रजनी नागपूरे, भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी राहूल पाटील, देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, आमगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, राखीव पोलीस निरिक्षक सुनिल बाम्‍डेकर, पोलीस निरिक्षक सर्वश्री श्री शुक्ला (गोंदिया शहर), श्री देशमुख (रामनगर) श्री पाटील (गोंदिया ग्रामीण), श्री उईके (गंगाझरी) श्री कोळी (तिरोडा), श्री गावडे (रावणवाडी), श्री सांडभोर (आमगाव), श्री कदम (गोरेगाव), श्री चव्हाण (नवेगावबांध), श्री बंडगर (अर्जुनी/मोर), श्री भस्मे (केशोरी), श्री खंदारे (सालेकसा), श्री तिवारी (चिचगड), श्री तटकरे (देवरी), स्थानिक गुन्हे शाखेचे श्री रणवरे, नक्षल सेलचे श्री केंद्रे, जिल्हा विशेष शाखेचे श्री धुमाळ, कार्यालयीन अधीक्षक संतोष गेडाम, वाहतुक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक श्री डोंगरे, सहायक पोलीस निरिक्षक श्री हेमने (दवनीवाडा), श्री वाभळे (डुग्गीपार), पोलीस उपनिरिक्षक श्री वाघ, श्री शेख, श्री सातपुते, श्री पुजारी, श्री खरड, राज्य राखीव दल अमरावती व जालनाचे कंपनी कमांडर व प्लाटून कमांडर, पोलीस मुख्यालयाचे श्री चव्हाण यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहीद पोलीस स्मृती स्तंभास पुष्प वाहिली.
कार्यक्रमाला जिल्हा पोलीस कार्यालयातील तसेच जिल्ह्यातील पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरिक्षक गोसावी यांनी मानले.