जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

0
16

मुंबई-ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘चार नगरातील माझे विश्व’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
नारळीकर यांच्या जन्मापासून त्यांनी वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये वास्तव्य केले. या शहरांतील वास्तव्यावर आधारित असलेल्या या पुस्तकाची साहित्य अकादमीसाठी निवड करण्यात आली. नारळीकर यांनी याआधी अनेक विज्ञानकथा लिहिल्या आहेत. त्यामध्ये वामन परत न आला, व्हायरस, यक्षाची देणगी, याला जीवन ऐसे नाव, टाइम मशिनची किमया या पुस्तकांचा समावेश आहे. यक्षाची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
नारळीकर यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळाला आहे.