दिलदार हॉटेलवाला, प्रवाशांना फुकटात जेवण

0
11

अकोला दि.11: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 च्या नोटावर बंदी घालताना मात्र गाव सोडून बाहेर गेलेल्या हजारो नागरिकांचे काय होणार याचे विचार न करताच सरसकट बंदी घातल्याने प्रवाशाला गेलेल्या अनेकांची कोंडी झाली.परंतु या कोंडीतही त्यांना धीर देण्याचा चांगला प्रयत्न अकोला येथील दिलदार हाटेलच्या मालकांनी केला. त्यामुळे दिलदारपणाचं कौतुक करावं तितके थोडंच आहे. असाच दिलदार माणूस अकोल्यात पाहायला मिळाला. मुरलीधर राऊत असं या दिलदार व्यक्तीचे नाव आहे.

कारण नोटांच्या तुटवड्यामुळे प्रवाशांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मुरलीधर राऊत यांनी त्यांच्या मराठा हॉटेलमध्ये बाहेरगावावरुन आलेल्या प्रवाशांना मोठी मदत केली आहे.बाहेरगावावरुन आलेल्या फॅमिलींना त्यांनी हॉटेलमध्ये अक्षरश: फुकटात जेवण दिलं आहे. बाहेरगावच्या प्रवाशांनी हॉटेलमध्ये या, भरपूर खा, पैशाची काळजी करु नका, पुढच्यावेळी याल तेव्हा पैसे द्या, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.मुरलीधर राऊत यांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे अनेक भुकेल्या प्रवाशांना पोटभर अन्न मिळाले आहे. नोटा बंदीनंतर पहिल्या दिवशी या हॉटेलमध्ये सुमारे दीडशे प्रवाशांनी जेवण केले, तर दुसऱ्या दिवशीही शंभर जणांना या हॉटेलने जेऊ घातले.अकोल्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर बाळापूर इथं मराठा हॉटेल आहे. या हॉटेलचा सूचना देणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.