निलम हलमारे रेल्वे सल्लागार समितीवर

0
14

गोंदिया-दक्षिण मध्य रेल्वे बिलासपूर/नागपूर विभागाच्या सल्लागार सदस्यपदी छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष निलम हलमारे यांची नेमणुक झाली आहे. च्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून घेण्यात यावं अशी शिफारस भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी केली होती. तो प्रस्ताव रेल्वेनं लगेचच अंमलात आणलाय.हलमारे यांनी निवडीचे श्रेय खासदार पटोले यांना दिले आहे.तसेच्या येत्या बैठकिता गोंदिया स्थानकावरील काही समस्यासोबत प्रवाशांच्या सुविधेकरीता गोंदियातील प्लटफामर् 1 वरुन विदर्भ व महाराष्ट्र एक्सप्रेस सुरु करण्यासंदभार्त रेल्वेप्रशासनासोबतच खासदार पटोले यांच्याकडे मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. रेल्वेत अपंगांसाठी विशेष सुविधा करण्यात याव्यात अशी शिफारस करणार आहे. अपंगांना रेल्वेच्या डब्ब्यापर्यंत व्हिलचेअर तसंच वृद्धांना लिफ्टची सुविधा देण्याचंही ती सुचवणार आहे.गोंदिया स्थानकात लिप्टची व्यवस्था आणि प्लटफामर् क.6 वर शेडची व्यवस्था आणि प्रवाशासांठी फुटब्रीजची निमर्ीती यावर लक्ष वेधणार असल्याचे हलमारे यांनी म्हटले आहे.