आरोग्यासाठी ‘धन्वंतरी हेल्पलाईन’ सुरू होणार

0
6

गोंदिया : लवकरच गोंदिया जिल्ह्यात धन्वंतरी हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एका फोन कॉलवर नि:शुल्क तपासणीची व्यवस्था करून देण्यात येईल. भविष्यात हेल्पलाईनच्या माध्यमातूनच शस्त्रक्रियेची व्यवस्था शक्य होईल. पाच चरणांमध्ये हे काम करण्यात येईल, अशी माहिती पत्रपरिषदेत विश्व हिंदू परिषदेचे विजयजीतसिंह वालिया यांनी दिली.

पत्रपरिषदेत विहिंप-बजरंग दलचे पदाधिकारी देवेश मिश्रा, भीकम शर्मा, मनोज पारेख, नेमीचंद जैन, महेंद्र देशमुख, मनोज मेंढे, अभिमन्यू चतरे, राजेश जोशी, मिलिंद चौरे, वसंत ठाकूर उपस्थित होते. वालिया पुढे म्हणाले की, पुढील ५० वर्षांत विहिंप शिक्षण, आरोग्य, रोजगार व भोजन या चार बाबींवर काम करेल. संपूर्ण विदर्भात एक हजार ५०० एकल विद्यालय चालविण्यात येणार आहेत. भोजनाच्या व्यवस्थेसाठी अन्नपूर्णा योजनेंतर्गत ओकेशनल कोर्स चालविण्यात येईल. यात विविध प्रशिक्षण युवावर्गास दिले जातील व उद्योगपतींजवळ त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात येईल. त्यांनी संपूर्ण देशात नेत्रदान जनजागरण अभियान चालविण्याचा संकल्पसुद्धा केल्याचे सांगितले.