शिर्डी (अहमदनगर) : येथील बहुप्रतीक्षित विमानतळाचे काम तीन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून महाराष्ट्रदिनी पहिल्या विमानाचे लँडिंग होऊ शकते, असा विश्वास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे प्रफुल पटेल केंद्रीयविमान वाहतुक मंत्री असताना या विमानतळाच्या विकासाला सुरवात झाली होती. जगभरातून येणाऱ्या साईभक्तांसाठी राज्य शासनाने शिर्डीपासून पंधरा किमी अंतरावरील काकडी गावालगत दोन टप्प्यांत साडेतीनशे हेक्टर जागा घेऊन सहा वर्षांपूर्वी शिर्डी विमानतळाचे काम सुरू केले़ या कामासाठी प्राथमिक खर्च २१६ कोटी होता़ आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च झाले आहेत़ साई संस्थाननेही ४५ कोटी रुपये दिले आहेत़ विमानतळ विकास कंपनीने दोन महिन्यांपूर्वी संजीव पलांडे यांची विमानतळासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रलंबित कामांनी वेग घेतला़शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने प्रकल्पग्रस्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़, असे पलांडे म्हणाले.