हायकोर्टातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
4

नागपूर दि.१७:: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात आयोजित तीन दिवसीय रक्तदान शिबिराला सोमवारी पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वकील, रोटरी क्लब सदस्य, पत्रकार आदींनी मोठ्या संख्येत रक्तदान केले.

उच्च न्यायालय, विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशन, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर साऊथ व सामाजिक संस्था विहंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई (उच्च न्यायालय) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी न्या. भूषण धर्माधिकारी, न्या. रवी देशपांडे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. झेड. ए. हक, न्या. विनय देशपांडे, न्या. स्वप्ना जोशी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील, विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. पद्मा चांदेकर, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, शिबिर आयोजक अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्रकुमार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी संकलित रक्त मेडिकलच्या रक्तपेढीला देण्यात आले. उद्या, मंगळवारी मेयो तर, बुधवारी डागा रुग्णालयाच्या रक्तपेढीकरिता रक्त संकलन करण्यात येईल.