धुमाकूळ घालण्यास व्हॉट्स अॅप सज्ज

0
11

मुंबई: मॅसेंजिग जगतातील सुपरफास्ट आणि लोकप्रिय अॅप व्हॉट्स अॅप आता आणखी धुमाकूळ घालण्यास सज्ज झालं आहे. लवकरच व्हॉट्स अॅपवरून व्हॉईस कॉल करता येणार आहे.

व्हॉट्स अॅपच्या या घोषणेमुळे स्काईप आणि इतर मेसेजिंग अॅपसमोर मोठं आव्हान उभं राहाणार आहे.

यापूर्वी फेसबूकनेही व्हॉईस कॉलची सुविधा सुरू केली आहे. मात्र फेसबूकने व्हॉट्स अॅपची यापूर्वीच 19 बिलियन डॉलर्सला खरेदी केली होती. त्यामुळे हे दोन्हीही लोकप्रिय अॅप एकाच मालकाचे आहेत.

व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये व्हॉईस कॉल

नव्या सुविधेमुळे व्हॉट्स अॅपद्वारे युझर्सना आपल्या ग्रुपमधील फ्रेण्ड्सना व्हॉईस कॉल करता येणार आहे. कॉलिंग झाल्यांनतर तुमच्या स्क्रीनवर कॉल लॉग तपशीलही दिसणार आहे.

डच साईट अँड्रॉईडवर्ल्डने टेस्ट कोडचे स्क्रीनशॉटचे दर्शन जगाला घडवले आहे.

या स्क्रीनशॉटची निर्मिती अँड्रॉईडवर्ल्डच्या सँडर ट्यूईटने केली आहे. व्हॉट्स अॅपच्या वेबसाईटवरील अॅपच्या रॉ कोडमधून त्याने लेआऊट फाईल्स, इमेजस आणि टेक्स्ट मिळवले.

रीड रिसिट सुविधा

यापूर्वी व्हॉट्स अॅपने रीड रिसिट सुविधा सुरु केली आहे. यामुळे तुम्ही पाठवलेला मॅसेज दुसऱ्याने वाचला आहे की नाही हे कळतं. दोन निळ्या टिक डिस्प्ले झाल्यास, तुमचा मॅसेज वाचला आहे, हे रीड रिसिट सुविधेमुळे सेंडरला कळतं. इतकंच नाही तर आता ग्रुप चॅटमध्येही ग्रुपमधील सगळ्यांना मेसेज मिळाल्यानंतरच सेकंड ब्लू टीक दिसते.

दरम्यान, व्हॉट्स, फेसबुक किंवा स्काईपद्वारे करण्यात येणारे व्हॉईस कॉलिंग हे इंटरनेट कॉलिंग आहे. मात्र नुकतंच एअरटेलने इंटरनेट व्हॉईस कॉलिंगचे रेट वाढवल्याने, ग्राहकांमध्ये नाराजी आहे