39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Featured News सोमवारला डव्वा येथे राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन

सोमवारला डव्वा येथे राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन

0
29

गोरेगाव,दि.११-क्षत्रिय राजाभोज पोवार समाज डव्वा(सटवा)च्या वतीने सोमवार १३ फेबुवारीला राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९ वाजता शोभायात्रेचे उदघाटन युवा स्वाभीमानचे अध्यक्ष जितेश राणे यांच्या हस्ते दुर्गाभाऊ ठाकरे,सरपंच जगदिश बोपचे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.दुपारी ४ वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.सभापती मोरेश्वर कटरे यांच्या हस्ते होईल.दिपप्रज्वलन बेरार टाईम्सचे संपादक व ओबीसी संघर्ष कृती समितीचे गोंदिया-भंडारा समन्वयक खेमेंद्र कटरे,माजी सरपंच जितेंद्र कटरे,भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रकला चौधरी व बाजार समितीचे उपसभापती श्रीप्रकाश रहागंडाले यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून श्रीशिव प्रतिष्ठान qहदुस्थानचे अध्यक्ष दुर्गेश रहागंडाले,ओबीसी कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे,सटवाचे सरपंच रमेश ठाकुर,बाजार समिती संचालक के.टी.कटरे,रुषीलाल टेंभरे,मुकेश तुरकर,विनोद पारधी,कैन्हयालाल कोल्हे,मनिष गौतम,श्री चौधरी व श्री येळे उपस्थित राहणार आहेत.