24.4 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Featured News दिलखुलास मध्ये वन पर्यटन

दिलखुलास मध्ये वन पर्यटन

0
38

गोंदिया,दि.०१ मार्च : गोंदिया जिल्हा हा वनसमृध्द असा जिल्हा आहे. या जिल्हयातील हाजराफॉल धबधबा आता विदर्भातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पुढे आले आहे. वन पर्यटन या विषयावर गोंदिया जिल्हयाचे उपवनसरंक्षक डॉ.जितेंद्र रामगांवकर यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार १,२ आणि ३ मार्च २०१७ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत होणार आहे. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.