बालपांडे कुटुुंबीयांचे मंत्र्यांकडून सांत्वन

0
7

भंडारादि.१५: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले मंगेश बालपांडे यांच्या घरी भेट देऊन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी त्यांच्यासोबत आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाने, भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सोनवाने, चंद्रहास राऊत यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.बालपांडे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खाच्या प्रसंगात आपण एकटे नसून संपूर्ण जिल्हा आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.सैनिक कल्याणसाठी असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा तात्काळ लाभ देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी ना. दीपक सावंत आणि ना. राजकुमार बडोले यांनी बालपांडे कुटुंबीयांना दिली.