“यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा”- विदर्भ जनांदोलन समिती

0
7

यवतमाळ-महाराष्ट्राच्या युती सरकारने नुकताच विधीमंडळाच्या पटलावर महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा फारच प्रतीक्षा असलेला अहवाल सादर करण्यात आला.त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारस केली.ग्रामीण भागातील प्रचंड अडचणी ,आर्थिक संकट व अभुतपूर्व कृषी संकट यावर केळकर समितीच्या सर्व नऊ सदस्य सह नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी यांनी शेतकरीनेते किशोर तिवारी मोहन जाधव व शेकडो शेतकरी विधवा व गावागावातील महिलांनी दारूच्या विरोधात एल्गार पुकारत रस्त्यावर उतरुन आंदोलने करीत असलेल्या माय बहीणीची हाकेला दाद देत हि शिफारस केली असुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या डॉ.विजय केळकर समितीच्या यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारसीची बजावणी तात्काळ करावी अशी मागणी यवतमाळ जिल्या दारूमुक्त करण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या कृती समितीच्या संयोजक अपूर्वा तिवारी यांनी केली आहे .
३० जोनेवारी २०११ला यवतमाळ जिल्यातील हजारो महिलांनी जिल्यात संपुर्ण दारूबंदीसाठी पांढरकवडा येथे मेळावा तर २०१२ मध्ये मार्च महिन्यात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपली मागणी रेटून धरली होती व तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केली होती व आता त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्री व मद्यपान यावर बंदी घालण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, अशी शिफारस करताना केळकर समितीने करून सरकारने यवतमाळ जिल्हा मद्यमुक्त घोषित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,सुधीर मुंगणटीवार यांनी विरोधीपक्षात असतांना जिल्यात संपुर्ण दारूबंदीच्या मागणीला पाठींबा दिला होता आता त्यांनी तात्काळ संपुर्ण दारूबंदी लागु करावी अशी विनंती अपूर्वा तिवारी यांनी केली आहे .
संपूर्ण यवतमाळ जिल्यात महिलांनी संपुर्ण दारूबंदीसाठी आंदोलन सुरु केले त्यातच आता शासनाने नेमलेल्या डॉ. विजय केळकर समितीनेही यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केल्याने महिलांच्या या आंदोलनाला मोठे बळ मिळाले आहे. दारूबंदीसाठी पुढाकार घेणार्‍या महिलांवर प्राणघातक हल्ला सारखेही प्रकार घडत आहे. त्यामुळे त्यांच्या चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूच्या विरोधात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी कारवाई करायची त्यांचेच छुपे पाठबळ असल्याने न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न महिलांपुढे निर्माण झाला आहे. अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.