४ व ५ जानेवारीला पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

0
9

गोंदिया, दि.३ : सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजुकमार बडोले हे ४ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. ४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथून सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमाराकडे प्रयाण. सकाळी १० ते १०.३० पर्यंत कोहमारा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कोहमारा यांचे कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता कोहमारा येथून सडक/अर्जुनी तालुक्यातील कोदामेडीकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता कोदामेडी येथे तालुकास्तरीय तेली समाज महामेळाव्यास उपस्थिती. दुपारी १२ ते १२.३० पर्यंत आमगांव तालुक्यातील साखरीटोला येथे स्त्री विद्यालय, गर्ल्स हायस्कूल या शाळेच्या स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता साखरीटोला येथून हाजराफॉलकडे प्रयाण. दुपारी १ ते १.१५ पर्यंत हाजराफॉल पर्यटन स्थळास भेट व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी १.१५ वाजता हाजराफॉल येथून सालेकसा तालुक्यातील कचारगडकडे प्रयाण. दुपारी १.४५ वाजता कचारगड येथे जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.४५ वाजता कचारगड येथून शासकीय विश्रामगृह देवरीकडे प्रयाण. दुपारी ४.४५ ते ५.४५ पर्यंत शासकीय विश्रामगृह देवरी येथे राखीव. सायंकाळी ५.४५ वाजता देवरी येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण. सायंकाळी ६.३० वाजता सडक/अर्जुनी येथे आगमन व मुक्काम.
५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सडक/अर्जुनी येथून गोंदियाकडे प्रयाण. सकाळी १० वाजता सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ ते १२ पर्यंत भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी १२ ते १ पर्यंत शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. दुपारी १ वाजता गोंदिया येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण. दुपारी २ ते ३.४५ पर्यंत सडक/अर्जुनी येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.४५ वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण. सायंकाळी ४.३० वाजता नवेगावबांध येथे संबंधित अधिकाऱ्यांशी पर्यटनाबाबत आयोजित बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५.३० ते ६ पर्यंत शासकीय विश्रामगृह नवेगावबांध येथे वार्ताहर परिषदेत विविध विषयाबाबत चर्चा. सायंकाळी ६ वाजता नवेगावबांध येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण. सायंकाळी ६.३० ते ७ पर्यंत सडक/अर्जुनी येथे राखीव. सायंकाळी ७ वाजता सडक/अर्जुनी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.