24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home Featured News पुस्तकांच्या गावात शरद पवार ठरले पहिले वाचक

पुस्तकांच्या गावात शरद पवार ठरले पहिले वाचक

0
27
सातारा,दि.6 : सातारा जिल्ह्यातील भिलार येथे मोठ्या थाटामाटात पुस्तकांचे गाव उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारी पहिले वाचक पोचले ते थेट देशाचे माजी केंद्रीयमंत्री,माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार. या अनोख्या प्रकल्पाच्या भेटीसाठी मोठ्या कौतुकाने गावात आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेक दुर्मीळ पुस्तके चाळली. अस्सल राजकारणी म्हणून पवारांची ओळख असली तरी साहित्य क्षेत्रातील रसिक म्हणूनही त्यांची साहित्यिकांमध्ये ख्याती आहे. सतत नवनवीन पुस्तके वाचण्याचा छंद असणारे शरद पवार जेव्हा शुक्रवारी भिलार गावात आले, तेव्हा सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. पवार कुटुंबीयातील इतरही सदस्य त्यांच्या सोबत होते.
सर्व प्रथम गावच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या घरातील वाचनालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर बाळासाहेब भिलारे यांच्या घरीही जाऊन बुकशेल्फमधील अनेक दुर्मीळ पुस्तकांची पाहणी केली. विशेष करून एक शिवचरित्र त्यांनी बराच वेळ चाळले. सध्या त्यांचा मुक्काम याच परिसरात असून, शनिवारीही ते भिलारमधील नवनव्या पुस्तकांचा लाभ घेणार आहेत.