उच्च न्यायालयाने लोढ़ा ग्रूपच्या विरोधात दंड आणि व्याजाच्या वसुलीवर आणली स्थगिती

0
13

मुंबई,दि.6- कंपनीच्या वडाळ्यामधील विकसनासंदर्भात स्टँप कलेक्टरांच्या अनुचित आदेशाला लोढ़ा ग्रूपने आव्हान दिले होते आणि  उच्च न्यायालयाने दंड व व्याजाच्या वसुलीवर तत्काळ स्थगिती आणली आहे. मा. उच्च न्यायालयाने कंपनीला ह्या आदेशाच्या विरोधात पात्र प्राधिकरणाकडे प्रिंसिपल रकमेचा 60 दिवसांमध्ये भरणा करून आवेदन दाखल करण्याससुद्धा सांगितले आहे.काही वृत्तपत्रांमध्ये आज असे वृत्त देण्यात आले की, स्टँप कलेक्टरने लोढ़ा ह्यांच्याविरोधात काही मागणी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकामध्ये लोढ़ा ग्रूपच्या प्रवक्त्यांनी म्हंटले, “आम्हांला आनंद आहे की, आमच्या भुमिकेला न्याय मिळाला आहे आणि आता आम्ही पात्र प्राधिकरणाकडे जाऊन आयसीआयसीआय वि. महाराष्ट्र राज्य ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण करू आणि त्यांच्यासमोर सिद्ध करू की, स्टँप ड्युटीची मुद्दल रक्कम लीज डीडच्या अंमलबजावणीच्या वेळेस देय असून ती लीज कराराच्या वेळेस देय नाही. लोढ़ा ग्रूप कॉरपोरेट प्रशासन व नैतिकतेच्या अतिशय उच्च दर्जासह आपले काम करत असतो.”